उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?

राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलय. मनसैनिकांनी तशी विनंती राज ठाकरेंना केली. आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंना खरच टाळी देणार का? पाहुया खास रिपोर्ट.

ठाकरे बंधू एकत्र येणार! राज आणि उद्धव एकीसाठी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी! कोण देणार पहिली टाळी? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या नाट्यमय घडामोडी च्या केंद्रस्थानी जरी राष्ट्रवादी काँग्रेस असली तरीही अचानकपणे ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा रंगू लागली आहे. मनसेचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी दादर भागात लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. राजसाहेब आणि उद्धवसाहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहतोय!” असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आलाय.

कार्यकर्ते आणि जनतेच्या मनातील या भावना मनसेच्या बैठकीत नेत्यांनी राज ठाकरे समोर मांडल्या, मात्र त्यावर सध्या तरी कोणतीही भूमिका घेतलेली नसली तरीही त्याबाबत काही सूचक संकेत दिलेत. राज ठाकरेंनी यावर उत्तर देत सांगितल “मी मेळावा घेईन तेंव्हा यावर बोलेल”.

यापूर्वीही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे काही प्रयत्न झाले. वरळीतल्या शिवसैनिक सतीश वळंजू यांनी 2010 साली “माझी चळवळ मी महाराष्ट्राचा” या नावानं ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी एक अभियान सुरु केलं होतं. त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक मध्ये सभा घेतल्या. तर सप्टेंबर 2010 मध्ये एक मूक मोर्चाही काढला होता. दादरच्या शिवाजी पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा आधी राज ठाकरेंच्या घराकडे गेला आणि नंतर तो मातोश्रीच्या दिशेने गेला. पण हे अभियान पुढे थंडावलं.

त्यानंतर 2013 साली शिवसेनेच्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना “एका हाताने टाळी वाजत नाही” असं अप्रत्यक्षरीत्या सुचवत महायुती आमंत्रण दिलं होतं. त्यावर “तिकडून टाळी आली मग मी टाटा केला” असा खोचक विधान करत युतीचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी फेटाळला होता. आता पुन्हा ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर मनसेच्या नेत्यांनी ही काहीसा सावध आणि नरमाईचा सूर लावलाय.

सध्या हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राजकीय भरारी घेण्याची तयारी चालवली आहे. तर बंडामुळे गलितगात्र झालेल्या शिवसेनेला पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे समोर सुद्धा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राजकीय गरज म्हणून हे ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

आपल्या यूट्यूब चॅनल आदर मराठीचा ला नक्की भेट द्या 

Ajit Pawar: अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 40 आमदार नेमके कसे आणि का फुटले, …

Leave a Comment