तुमचं आयुष्य खराब करू शकत्या या 30 सवयी: आजच सोडा नाहीतर… Marathi Motivational 30 Line

Marathi Motivational 30 Line

 1. सोशल मीडिया टीव्हीवरील व चित्रपटांमध्ये जे दिसते ते वास्तवात नसते हे लक्षात ठेवा.
 2. उधार दिलेले पैसे मागण्यास अजिबात लाज बाळगू नका.
 3. मूर्ख लोकांच्या नादी लागून वाया घालवू नका.
 4. नीट पारख केल्याशिवाय कुणालाही जवळ करू नका.
 5. घरातील खाजगी गोष्टी चुकूनही घरच्या बाहेरच्या माणसांना सांगू नका.
 6. लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात.
 7. तुमच्याकडे असणारी कौशल्य तुम्हाला ज्या गोष्टी येतात त्या फुकट देऊ नका त्या बदल्यात योग्य तो मोबदला घ्या.
 8. सोडून गेलेल्या व्यक्ती साठी जास्त काळ शोक करत बसू नका जे आहे त्यांची काळजी घ्या.
 9. भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा स्फोट होतो.
 10. देवावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण माणुसकी जरूर जपा.
 11. कधीच कोणालाही जामिन राहु नका.
 12. नेहमी तक्रार करणे रडणे सोडून द्या कुणालाही ते आवडत नसते.
 13. तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणालाही सांगू नका.
 14. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वास घात होऊ शकतो.
 15. तुमच्या आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळेच अगदी उघड करू नका लोक गैरफायदा घेतात.
 16. विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे आतील हेतू ओळखून घ्या.
 17. तारुण्य कधीच परत येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका.
 18. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा पारखण्याची चूक झाली तर आयुष्य उध्वस्त झालंच म्हणून समजा.
 19. स्वतःच्या कंफर्ट झोन मधून खूप आरामदायी जीवनातून बाहेर पडा.
 20. आळसामुळे आपल व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते.
 21. तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका. स्वतः ला कमी लेखणे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास खूप कमी होतो आणि अशा माणसाची प्रत्येक ठिकाणी हार निश्चित असते.
 22. व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते.
 23. सतत चिंता व काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचारांनी जगा.
 24. नेहमी कुणाच्यातरी धाकात राहणं सांगकाम्या सारखा वागन या गोष्टी सोडून द्या.
 25. स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो अहंकारामुळे दुर्गति होते.
 26. व्यसन व्यक्तीची शारीरिक कौटुंबिक आर्थिक हानी करते आणि म्हणूनच या पासून नेहमी दूर राहा.
 27. रागाच्या भरात उचललेलं पाऊल नेहमी चुकीच्या दिशेला जात.
 28. आर्थिक साक्षर बना अन्यथा कितीही पैसा आला तरी त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते.
 29. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे माणसाचे शत्रू आहे यांच्यापासून दूर राहा.
 30. पॉ.. व्हिडीओ पाहणं बंद करा विवाहबाह्य संबंध ठेवू नका विनाकारण अनेक आजारांना ओढवून घ्याल.

दररोज सुंदर विचारांची शिदोरी वाचण्यासाठी नक्कीच फॉलो करा.

आणि आपल्या यूट्यूब चॅनल ला नक्की भेट द्या 

3 thoughts on “तुमचं आयुष्य खराब करू शकत्या या 30 सवयी: आजच सोडा नाहीतर… Marathi Motivational 30 Line”

Leave a Comment