Aadar Marathicha

Devendra Fadnavis Eknath Shinde केंद्रात जाणार, Ajit Pawar CM होणार ? राज्यात पुढे काय काय होणारे..

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra Fadnavis

Eknath Shinde Devendra Fadnavis केंद्रात जाणार, Ajit Pawar CM होणार ? राज्यात पुढे काय काय होणारे..

काल रात्री अचानक पण एक मेसेज व्हायरल झाला. मेसेज मध्ये सांगण्यात आलं होतं की अजित पवार मुख्यमंत्री आणि विनोद तावडे उपमुख्यमंत्री. Devendra Fadnavisचं काय? तर फडणवीस म्हणे केंद्रत जाणार. Eknath Shinde च काय? तर Eknath Shindeना एकतर अपात्र करणार किंवा Eknath Shinde यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाणारे. काही जण तर असे म्हणत होते की Devendra Fadnavis ना भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करणार. महाराष्ट्रात विनोद तावडेंना परत पाठवणार. सकाळपासून Eknath Shinde घटातले आठ ते दहा आमदार आमच्या संपर्कात असून ते माघारी फिरणार असल्याचं विनायक राऊत सांगून गेले. काल दुपारी मंत्रीपदावरून Eknath Shinde गटातल्या दोन नेत्यांची भांडणं झाली. दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हे भांडण मिटवायला मुख्य मंत्री Eknath Shinde नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईला यावे लागेल. असा देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या. सांगणारे तर अस ही सांगतात की Eknath Shinde यांच्या अंगावर धावून जायला सुद्धा काही जणांनी मागेपुढे पाहिलं. नाहीये पण नेमक चालेलेल काय. या चर्चा चालू आहे. यात किती लॉजिक वाटते काय होऊ शकत आणि काय होणार आहे? हेच आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत.

तर नेमकं काय होऊ शकतो हे फक्त अंदाजच आहे. झालेली राजकीय खिचडी पाहतात एक एक पक्ष आणि एक एक नेते घेऊनच आपल्याला आता पुढे काय काय होऊ शकतो याचा अंदाज बांधता येतील. सगळ्यात पहिल्यांदा चर्चा करूया ती शिंदे गत आणि एकनाथ शिंदे यांची. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाणार. एकनाथ शिंदे अपात्र ठरणार. अशा चर्चा चालू आहे. एकनाथ शिंदे अपात्र करायचंच आहे म्हणूनच भाजपने अजित पवारांना सोबत घेतले असा देखील चर्चा झाल्यास या गोष्टींमध्ये तेवढं तथ्य वाटत नाही. कारण समजा आज अजित पवार आले. म्हणून एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पर्यंत या सगळ्या माध्यमातून चुकीचा मेसेज जाणारे एकनाथ शिंदे मुळे मुळ शिवसेना ला डॅमेज करणं सोपं गेलं. आता जर एकनाथ शिंदे हटवल तर हाच उलटा फोर्स ठाकरे यांची ताकद वाढ होताना दिसेल. आणि त्याचा मोठा फटका या मुंबई महानगरपालिकेत बसेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी पूर्वी अजित पवार यांना मुख्यमंत्री करून भाजपला फायदा होणार नाही. हे बऱ्याच महानगरपालिकांच्या निवडणुकांचा विचार करता आणि शहरी भागात असलेले शिवसेनेचे महत्त्वफाटा एकनाथ शिंदे तडका फडकी काढण्याची रिस्क भाजपा कोणत्याही स्वरूपात घेणार नाही. कारण त्यातून भाजप माणसांना वापरत आणि वापरून झाल्यानंतर फेकून देत हा मेसेज जाऊ शकतो. याचा फटका अजित पवारांना सुध्दा बसेल. कारण आता अजित पवारांना जास्तीत जास्त आमदार कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याकडे खेचून घ्यायचे. यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं अजित पवारांना पॉवर मिळेल पण अजित पवारांचा देखील एकनाथ शिंदे होईल. आणि हे पर्सेप्शन जोरात शरद पवार गटाला मांडता येईल. अर्थात या गोष्टीमुळे एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याची रीस्क आता भाजप घेणार नाही. पक्षात येणाऱ्यांचा भाजपा सन्मान करतो, हे भाजपला दाखवून द्यावेच लागणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांचा सन्मान करत दोघांचे बळ वाढवत राहणे हेच सध्या भाजपचे धोरण असणार आहे. किमान महानगरपालिका आणि महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तरी, शिंदे यांच्या पदाला धक्का लागण्याची जवळपास चिन्ह नाहीयेत असं म्हणता येतं.

आता यामधे दुसरा नंबर लागतो तो भाजप आणि फडणवीसांचा. फडणवीसांना केंद्रात पाठवले जाईल अशा चर्चा पुन्हा जोरात चालू झाल्या. कारण राज्याला 2-2 उपमुख्यमंत्री मिळाले. पण शेजारच्या कर्नाटक राज्यात एकाच वेळी तीन तीन उपमुख्यमंत्री करण्याची कामगिरी भाजपने यापूर्वी करून दाखवली. सत्तेत सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही आहे. भाजपा च लक्ष आता पूर्णपणे लोकसभेच्या निवणुकी 48 खासदार देणारे महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात जास्त खासदार निवडून देणार दुसरा राज्य आहे. त्यामुळें कुठलाही स्वरूपात महाराष्ट्रातून मिशन 45 आणण हे मोदी आणि शाह साठी गरजेचे आहे. अशा वेळी राज्यामध्ये पक्षावर एक हाती कंट्रोल देऊ शकणारे फडणवीस नसतील तर भाजपची वाताहात महाराष्ट्रातला लागायला उशीर लागणार नाहीये. जे लोक आपल्या महत्तवकांशे पायी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात जाऊ शकतात. ते लोकं वेळ आली तर भाजपला सुद्धा पायाखाली घेऊ शकतात. त्यामुळे भाजप देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घेऊन जाण्याची रिस्क आता घेणार नाही. शिंदे अजित पवार असा बॅलन्स साध्य करत भाजप ला एक वर्ष पूर्ण करायचे. आणि मग लोकसभा लढवायच्या. त्यामुळे काही करून फडणवीस जाणार तर नाही. शिवाय उपमुख्यमंत्री पदावर काम राहूनच ते सगळे बॅलन्स करतील. भविष्यातली ही शक्यता विचारात घेऊनच सत्तेत बाहेर राहून काम करण्यापेक्षा सत्तेत जाण्याचा आग्रह पक्षाच्या हायकमांडने फडणवीस कडे केला होता. हे स्पष्ट होते.

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस हा पारंपरिक विरोधक असल्याने भाजपचे मूळ कार्यकर्ते आणि गेल्या दहा वर्षांपासून तयारी करत असलेले नेते नाराज आहे. उदाहरण मुश्रीफांचे येणारे समरजीत घाटगे हे नाराज झाले. अशा वेळी समरजीत घाटगे यांची समजूत घालू शकणारे फडणवीस राज्यात असणं महत्त्वाचं आहे. जागा वाटपाच्या वेळी तर ही नाराजी अजूनच वाढणारे आहे. त्यामुळे फडणविस सध्या तरी काही केल्या केंद्रामध्ये जात नसतात.

आता नंबर लागतो तो अजित पवारांचा. अजित पवारांना उपुख्यमंत्री व्हायचं होतं तर ते का जातील. त्यांची महत्त्वाकांक्षा तर मुख्यमंत्री पदाची आहे. आणि ते कधी ना कधी मुख्यमंत्री होणारच मनात आणलं तर याच वर्षी मुख्यमंत्री होऊ असे अजित पवार म्हणाले. याचा अर्थ अजित पवार मुख्यमंत्री होतील का तरी याची शक्यता सध्या कमी दिसते. कारण काय तर अजित पवार आता मुख्यमंत्री झाले तर ते तात्पुरते असतील याची जाणीव खुद्द अजित पवारांना आहे. एकाच अर्थसंकल्प साठी मुख्यमंत्रीपद घेण्याऐवढे अजित पवार दुधखुळे नाहीत. अजित पवार यांच्या भाषणात अजित पवार पुढची गेम खेळत असल्याचे दिसतात. आता अजित पवार निवडणुकांचा मोसम धरतील. काहीही करून एकट्याच्या जीवावर 70 प्लस आमदार निवडून आणण्याची खेळी अजित पवार करतील. त्यासाठी योग्य शरद पवार विरोध ते अमलात आणताना दिसतील. मुख्यमंत्रीपद दिले यापेक्षा मुख्यमंत्रीपद घेतल इतकी महत्वकांक्षी तर अजित पवार नक्कीच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे समीकरण साध्य करत संपूर्ण पाच वर्षांसाठी स्थिर सरकार. सरकारचा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा अजित पवार बाळगून असते. काकांच्या छत्रछायेखाली मुख्यमंत्री होण्याची इच्छा तीस वर्ष दाबून ठेवणारे अजित पवार आपली महत्त्वाकांक्षा वर्षा दीड वर्षांसाठी सहज दाबून ठेवू शकतात. त्यामुळेच अजित पवारांच्या लगेच मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांमध्ये तितक बळ वाटत नाही. त्यांचा एक वर्षाचा संघर्ष हा शरद पवारांचा असणारे आहे. अशाच वेळी शिंदे फडणवीसां सामोरं आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करून या दोघांना सोप विरोध करण्याची रिस्क अजित पवार आता घेणार नाही.

आता बोलता येईल ते उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाबाबत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आगमनामुळे बॅकफूटवर गेला तो शिंदे गट. आणि पुढे आला तो ठाकरे गट. उद्धव ठाकरे यांचं बळ वाढले ते शिंदे जाणाऱ्या चर्चांमुळे. त्यातच मंत्री पदाची अपेक्षा ठेऊन असणाऱ्या अनेक नेत्यांना आपल्या महत्वकांक्षा वर पाणी सोडावे लागणार आहे. राजकीय कारकिर्दीत सीनियर ठेवायचे असेल तर या सरकारमध्ये सीनियर आहे अजित पवार. त्यानंतर सीनियर देवेंद्र फडणीस आणि त्यानंतर नंबर लागतो तो एकनाथ शिंदे यांचा. अजित पवार आणि फडणवीस यांचा प्रशासनावर असणारा होल्ड आणि काम करून घेण्याची क्षमता पाहता शिंदे मुख्यमंत्री पदावरून बाजूला जाणार नाही. आणि प्रशासनावर ची एकूण पकड जाणार हे तर फिक्स आहे. आता या परिस्थितीचा सगळ्यात जास्त फायदा ठाकरे घेताना दिसतो. परत फिरा भूमिकेवर एखादा दुसरा आमदार मागे आला तरी ठाकरे गट प्लस मध्ये जाऊ शकतो. ठाकरे गटातले नेते फक्त असा दावा करत दबावाचे राजकारण करता हे. शिंदे गटातील नेटे माघारी फिरणार नाही हे स्पष्ट आहे. कारण मतदारसंघात वाढलेली तीन पक्षांची ताकद त्यांच्या जवळ आहे. फक्त चिखली मतदार संघाची गणित अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे बिघडू शकतात. आणि भाजप अजित पवारांना ज्या मतदारसंघात फ्रीहँड देऊ शकतो करू शकतात. पण आता त्याची शक्यता कमीच वाटते. शिंदे पदावरून दूर गेले तरच ही गोष्ट साध्य होऊ शकते. कारण सोबत असणारे आमदार सोबत कमी आणि फडणीसांसोबत अधिक आहे. बाकी अजित पवारांचे एन्ट्रीने आणि शरद पवारांच्या सहानुभूतीने ठाकरे गटाची बार्गेनिंग पॉवर आता परत पूर्ववत आली आहे. आता शरद पवारांना ठाकरे यांची गरज असणारे आणि ठाकरे जागावाटप पासून ते मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार पर्यंत सगळ्या ठिकाणी आपला वरचष्मा ठेवतील हे देखील नक्की.

आता नंबर लागतो तो शरद पवारांचा 6 चे 54 करणारा पवार वर आता पुन्हा 6 ची 54 करण्याची वेळ आली आहे. आता शरद पवार मोदी विरोधाची लाईन पक्की करताना दिसते. मोदी विरोधाची संपूर्ण मतं आपल्याकडे कशी राहतील याची जुळणी करताना दिसतील. याचं साठी त्यांना कुठल्याही स्वरूपात राहुल गांधी आणि काँग्रेस ची गरज लागणार आहे. कारण अजित पवारांच्या खुलाशामुळे ठीक ठिकाणी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह विचारला जाईल. अशा वेळी राहिलेले टिकवण्यासाठी काँग्रेसला मोठा भाऊ करण्याची वेळ पवारांवर येईल. यात बार्गेनिंग पॉवर वाढेल ती काँग्रेसची. अजित पवार यांच्या बंडानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे कराड गेले. त्या कार्यक्रमाला काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांचं सख्य तर आपण जाणतोच. चव्हाणांच्या उपस्थितीची काळजी यावेळी पवारांनी थेट दिल्लीतन घेतल्याचं सांगितलं जातं. थोडक्यात पवारांना आता काँग्रेसला देत स्वतःच बळ वाढवण्याची गरज आहे. बाकी आमदारांची यादी शरद पवार मागे फेकले गेले असले तरी खरे गेम दुसऱ्या क्रमांकावर असणारा उमेदवारांच्या वरती ठरणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहिले राष्ट्रवादीचे इशू कोणती भूमिका घेतात यावर ती बरीच गणिते ठरते. आणि त्यातूनच शरद पवार कमबॅक करतील की नाही याचा अंदाज लावता येईल. शरद पवार नंतर चर्चा करावी लागते ती काँग्रेसचे. कारण काँग्रेस सध्या एक नंबर वर जाऊ शकतो अशी स्थिती आहे.

दिल्ली हायकमांडच्या महाराष्ट्र काँग्रेसकडे झालेले दुर्लक्ष आता भरून निघू शकतात असे बोलले जाते. 2019 ची एखाद दुसरी सभा वगळता राहुल गांधी महाराष्ट्र कडे फिरकले नव्हते. त्यातही भारत जोडो महाराष्ट्राच्या एका टोकावरून गेली परिणाम झाला नव्हता. अशातच लोकसभा आणि विधानसभा नवडणुकीपूर्वी काँग्रेसचा एक गट सुटा सुटा का होईना पण भाजप सोबत जाऊ शकतो अशा शक्यता आहे. अशोक चव्हाण विश्वजीत कदम देशमुख बंधू अशी बरीच नावं भाजपने जाऊ शकता त्यासाठी सातत्याने चर्चेत असतात. राज्यातल्या विरोधी पक्षाची जबाबदारी आता संख्याबळानुसार कॉंग्रेस कडे जाताना दिसेल. अशा वेळी पृथ्वीराज चव्हाण यांना विरोधी पक्षनेता अथवा प्रदेशाध्यक्ष करण्याचा मोठेपणा काँग्रेस हायकमांला दाखवाच लागेल. कारण देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासारख्या संसदीय कार्यपद्धतीचा अभ्यास असणाऱ्या आणि छक्के पंजे माहित असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पृथ्वीराज चव्हाण सारखे नेते अडचणीत आणू शकतात. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे नाव येत्या काळात काँग्रेस मधून मोठं होताना दिसेल.

दुसरीकडे काँग्रेस ची काही लोकं भाजपसोबत जाताना सुद्धा दिसते. पण ते प्रमाण शिंदे पवार यांचे प्रमाण घाऊक नसणार आहे. थोडक्यात महाराष्ट्र काँग्रेस सध्याच्या क्षणी सगळ्यात योग्य टायमिंग आलेली आहे. फक्त नेतृत्व एकमुखी दिले तर कॉंग्रेसला महाराष्ट्रात अच्छे दिन येऊ शकतात. आजवर महाराष्ट्र उभा राहू शकली नाही ते शरद पवारांसारख्या स्पर्धकांमुळेच. अर्थात पवारांचे राजकारण कमी होत असेल तर याचा फायदा कॉंग्रेसला होईल. पण पुन्हा हीच चर्चा होईल काँग्रेसने नेतृत्वाची. हायकामंडणे नेत्यांवर ती विश्वास जर टाकला तर नक्कीच काँग्रेस हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर येताना दिसत असेल.

तर जाता-जाता व्हायरल होणारे दावे आणि त्याचे उत्तर थोडक्यात पाहुया. अजित पवार मुख्यमंत्री तावडे उपमुख्यमंत्री अस होईल का? याची शक्यता वाटत नाही. कारण दोन्ही चेहरे मराठा आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरतील का? ते जातील का? तर नाही. कारण उपयोग संपल्यानंतर भाजप संपवत हे पर्सेप्शन भाजप या क्षणी होऊ देणार नाही. मुंबई महानगरपालिका होत नाही तोपर्यंत तरी एकनाथ शिंदे यांना घालवण्याचे कोणतेही चान्सेस भाजप घेणार नाही. फडणवीस केंद्र जातील का? तर नाही महाराष्ट्र भाजप ला एक हाती शिंदे यांनी अजित पवारांवर ती कंट्रोल ठेवायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाहीये. आता अजित पवार लगेच मुख्यमंत्री होतील का? तर नाही. अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं तर भाजप अजित पवारांना सुद्धा तात्पुरतं वापरणार असं मत तयार होईल. त्यामुळे राष्ट्रवादीचे मतदार हे अजित पवार सोबत येणार नाही. त्यामुळे लगेचच अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाणार नाही. शिंदेंचे आमदार परत फिरतील का? चर्चा होतील पण शक्यता कमी राहतील. ठाकरेंकडे जाऊन विरोधातच बसावं लागेल. त्यामुळे मंत्रीपद नसेल तर फायदा तरी घेता येईल. वेळ आली तर हे लोक भाजपमध्ये जातील. पण उद्धव ठाकरेंकडे परत येण्याचे चान्सेस कमी आहे. जिथं राष्ट्रवादी मुळे अडचण होईल. अशा ठिकाणचे काही लोकं मतदारसंघ वाचवण्यासाठी फिरू शकतील. पण त्यांचं प्रमाण कमी असेल आणि ही गोष्ट लगेच होण्याची शक्यता सुद्धा कमीच आहे.

बाकी तुम्हाला या संदर्भात का वाटते तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. माहितीपूर्ण पोस्ट वाचाण्यासाठी नोटिफीकेशन ऑन करायला विसरू नका. आणि आपल्या यूट्यूब चॅनल आदर मराठीचा ला नक्की भेट द्या.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?

 

Ajit Pawar: अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 40 आमदार नेमके कसे आणि का फुटले

Exit mobile version