वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे ? vastushastra marathi

कोणत्या दिशेला कोणत्या वस्तू ठेवाव्या म्हणजे घरात येईल सुख समाधान

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे
वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

वास्तुशास्त्रात दिशांना खुप महत्त्व आहे . घर बांधताना सर्वात आधी कोणत्या दिशेला काय असावे ,व कोणत्या दिशेला काय असु नये या विषयी माहिती काढली जाते. एकुण दहा दिशा आहे परंतु ,वास्तुशास्त्रात आठ दिशांचा विचार केला जातो. प्रत्येक दिशा कोणत्यान कोणत्या भगवतांची दिशा असते. म्हणुन त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराची रचना करावी लागते. तेव्हाच आपल्या घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे होते. व आपले घर सुख समृध्दी ऐश्वर्य देणारे ठरते.
आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला काय महत्त्व आहे . व कोणत्या दिशेला कोणती वस्तु ठेवल्यास ,आपल्याला त्याचे काय फायदे व काय तोटे होतील.

1) ईशान्य दिशा:
ईशान्य दिशा ही देव घराची दिशा आहे . साक्षात ईशान्य दिशा ही परमेश्वराची दिशा होय. पुर्व आणि उत्तर यांच्यामध्यावरील दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा होय. वास्तुवरील ही जागा सर्वात महत्त्वाची होय. संतान, पुत्र, धन, किर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव, देवी-देवतांचे आशिर्वाद , गुरु ,एखांद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अशा शुभ गोष्टींची ही दिशा आहे. आपल्या वास्तूमध्ये या जागेला नेहमी शुध्द पाणी , देवघर, तलाव , विहीर, अंतर्गत पाण्याचा साठा चालेल.

या जागेवर शक्यतोवर पांढरा किंवा फिका पिवळा रंग द्यावा. ईशान्य दिशेला नेहमी उतार असावा. ईशान्येच्या बाजुला प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढु नये. या कोपऱ्यात शौचालय , कचराकुंडी, शौचालयाची टाकी, चप्पल, झिना, विजेचा मीटर, स्वयंपाक घर इत्यादी गोष्टी असणे अशुभ असते. ईशान्य दिशेला नवरा-बायकोने झोपायचे टाळावे. अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ति, अथवा लहान मुले झोपली तर चालतील.

2) पुर्व दिशा :
या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या वास्तूमध्ये ऐश्वर्य, धन व बुध्दी मध्ये वाढ होते. हा भाग उंच असल्यास संततीला धोका निर्माण होतो व धनाचा नाश होतो. पुर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरात समृध्दी येते. या दिशेला घराचा दिवाणखाणा असावा. मुख्य दरवाजा असावा. या दिशेला शौचालय असल्यास रक्त विकार, उष्ण रोग, कावीळ होतात असा अनुभव आहे. या जागी फिका गुलाबी व पांढरा असे रंग असावे. या दिशेला फार उंच झाडे असु नये परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावी. या दिशेला कुंपन इतर दिशेपेक्षा कमी उंचीची असावी. राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी पूर्वच्या मध्यभागी दरवाजा असावा.

3) आग्नेय दिशा :
या दिशेला स्वयंपाक घर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते या दिशेला विजेचा मीटर, जनरेटर, व विजेचा मोटर अशा वस्तु असाव्यात. आग्नेय दिशेला विहीर . उप नलिका, पाण्याची टाकी असल्यास शत्रुंचा त्रास व अपघात
योग दाखवतात. या दिशेला वाहनतळ करु शकतात हा कोपरा दुषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो. या दिशेला काही दोष असल्यास कमीत- कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा. या दिशेला दार असल्यास संबंधित तज्ञाकडुन उपाय करुन घ्यावेत अशावेळी घरात नेहमी मतभेद असतात. या दिशेला हल्का गुलाबी फिकट केशरी रंग तुम्ही देऊ शकतात. आग्नेय चे दार दक्षिणेकडे असल्यास दिर्घ रोग व कटकटी असतात.

4) दक्षिण दिशा:
या दिशेला दार अशुभ असते या दिशेला दार असल्यास सतत त्रास होतो, आजारपण असते. ही दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेच्या भिंतीही इतर दिशेच्या भिंती पेक्षा जाड व उंच असाव्यात. या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एका मागे एक असे मृत्यू होतात.दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लावु नका. मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालुन येतात हे योग्य नव्हे. या दिशेला उंच झाडी लावावीत या दिशेला निळा भुरका रंग चालेल. या दिशेला शौचालय बाथरूम असल्यास पति -पत्नी मध्ये सतत कलह असतो. दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभफळ मिळते या दिशेला स्वयपांक घर असल्यास आर्थिक अडचण असते. या दिशेला तळघर असल्यास अल्प मृत्यु होतो.

5) नैऋत्य दिशा:
ही दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये उंच असावी या दिशेला घरातील मोठ्या लोकांचे बेडरूम असावेत तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवावी. या दिशेला झिना चालेल. शौचालय बाथरूम चुकुनही असु नये . या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो. या दिशेला गोडावुन अथवा वाहनतळ चालेल या दिशेला पाण्याची टाकी वास्तु पेक्षा उंच असल्यास अधिक चांगले. जी व्यक्ती घरात या जागच्या खोलीत राहते त्याचेच प्रभुत्व या घरावर राहते. या दिशेला दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा. या दिशेला शौचालय, पाण्याची टाकी , विहिर किंवा उतार असल्यास अपकिर्ती , बाहेरील बाधा किंवा चर्मरोग होतात. तसेच संकटाची मालिका चालु राहते असा अनुभव आहे.

6) पश्चिम दिशा:
या दिशेला नेहमी शौचालय किंवा बाथरूम असावे या दिशेला उतार असल्यास त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते. ही दिशा उंच असल्यास पुरुषांना किर्ती मिळते व्यवसाय वृध्दी होते . ईशान्य दिशेपेक्षा जास्त उतार असल्यास दु:ख भोगावे लागेल .गडद रंग सर्व चालतील.

7) वायव्य दिशा:
या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेडरूम असावेत. या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ असते या दिशेला विहीर,जमिनीचा खालचा पाण्याचा साठा असल्यास वेडेपणा, कावीळ असे रोग दर्शवतात. या दिशेला झिना असणे शुभ असते. ज्यांचे विवाह जमत नाही अशा व्यक्तींनी या दिशेला झोपावेत.

8) उत्तर दिशा:
साक्षात कुबेराची ही दिशा असुन या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसा कमी पडत नाही. या दिशेला नेहमी उतार असावा. या दिशेला पाण्याच साठा शुभ असतो. ही दिशा नेहमी साफ व सुंदर असावीत या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावीत. महत्त्वाचे बोलायचे असेल तर याच दिशेला तोंड करुन बोलावेत. या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावीत या दिशेला शौचालय असल्यास दारिद्र्य येते. मुलांनी अभ्यास करतानी याच दिशेला तोंड करावेत .

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या आदर मराठीचा या यूट्यूब चॅनल ला subscribe करा

घरापुढे बेलाचे झाड असणे शुभ की अशुभ ?

Leave a Comment